MHT-CET 2023 साठीचा फॉर्म कसा भरावा याबद्दल सविस्तर माहिती

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

तुम्ही १२ वी नंतर जर महाराष्ट्र राज्यामध्ये इंजिनिअरिंग (Engineering), अग्रीकल्चर (Agriculture), फार्मसी (Pharmacy) यापैकी कोणत्याही पदवीच्या कोर्सला प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला MHT-CET देणे अनिवार्य आहे. 

CET म्हणजे नेमक काय ? CET कशासाठी द्यावी लागते ? CET साठी फॉर्म कस भरायचा ? फॉर्म भरताना कोणते कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत या सारखे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले असतील अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.

शैक्षणिक पात्रता - विद्यार्थी हा १२ वी सायन्स मधून PCM किंवा PCB (PCMB) विषय घेतलेला असावा.

फॉर्म भरताना निवडायचे विषय - विद्यार्थी दोन्ही ग्रुप मधून फॉर्म भरू शकतो.
१) PCM (Physics, chemistry, Mathematics)
- B.Tech, BE, BCA, NDA, BCS, BBA etc. साठी PCM महत्वाचा ग्रुप आहे
२) PCB (Physics, Chemistry, Biology)
- Agriculture, Pharmacy, Bio Technology etc साठी PCB ग्रुप महत्वाचा आहे.

Application फॉर्म कसा भरायचा -
१) सर्वात प्रथम MHT CET च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे  https://cetcell.mahacet.org
२) त्यानंतर MHT CET २०२३ अप्लिकेशन फॉर्म अशी लिंक येईल त्या लिंक वरती क्लिक करावे.
३) New Candidate Registration हा ऑप्शन निवडावा.
४) त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म ओपन होईल त्या मध्ये विचारलेली माहिती योग्य रित्या भरावी आणि फॉर्म सबमिट करावा.
४) Syllabus किंवा आणखीन माहिती हवी असल्यास वेबसाइटला भेट द्या.

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख - 
 ०७ एप्रिल २०२३ ही अंतिम तारीख आहे.

फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे -
१) १० वी मार्कशीट
२) १२ वी मार्कशीट
३) जन्माचा दाखला
४) जातीचा दाखला
५) Domicile certificate
६) फोटो आणि सही स्कॅन केलेले असावे

Application फीस -
१) PCM – जनरल साठी ८०० रुपये & Category साठी ६०० रुपये
२) PCB – जनरल साठी ८०० रुपये & Category साठी ६०० रुपये

परीक्षेचे स्वरूप - एमएचटी सीईटी ही एक्झाम २०० मार्कची राहते. या परीक्षेमध्ये Negative (नकारात्मक) Marking पद्धत वापरली जात नाही.

परीक्षेचा कालावधी - साधारण ३ तास अवधी असतो.

टीप :- तुम्ही NEET/JEE किंवा MHT CET या तिन्ही परीक्षेचे फॉर्म भरू शकता.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Popular posts from this blog

|| Job Vacancies || बंपर भरती || महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी(MPKV,Rahuri) येथे नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती..

|| Big Recruitment at ICAR-NBPGR || New Delhi ||

Recruitment || Young Professional || Pune || ICAR - DOGR || Maharashtra