Job Vacancies || ICAR - CCRI, NAGPUR – केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३
आयसीएआर – केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी;
ICAR CCRI Nagpur (ICAR-Central Citrus Research Institute Nagpur) Recruitment
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचे ठिकाण याबाबतची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ..
निवडलेल्या उमेदवाराला २५ हजार रुपये मासिक पगार मिळणार आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये पोस्टिंगचे ठिकाण हे 'नागपूर' असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पदांची संख्या – यंग प्रोफेशनल पदाच्या 02 जागांवर 01 वर्षाच्या करारानुसार भरती करण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण - नागपूर
नियुक्ती कार्यकाळ – सुरवातीला नियुक्ती ही 01 वर्षांच्या कालावधीसाठी असेल नंतर वाढवण्यात सुध्दा येऊ शकते.
वयोमर्यादा - अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
शैक्षणिक पात्रता –
1) यंग प्रोफेशनल - 01
मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स इन सायन्स (उद्यानविद्या/कृषी/फळ विज्ञान) / M.sc ( Horti./ Agri./Fruit Science) आणि संगणक ज्ञान व कौशल्य.
यासाठी B.Sc (Agri/Horti) पदवी प्राप्त उमेदवार सुध्दा अर्ज करू शकतात.
मुलाखत दिनांक - 03/04/2023, सकाळी 10.30 नंतर
आरक्षण - SC कॅटेगरी
2) यंग प्रोफेशनल - 01
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक अनुप्रयोग किंवा व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षाचा कामाचा अनुभव
मुलाखत दिनांक - 05/04/2023, सकाळी 10.30 नंतर
आरक्षण - नाही (अनारक्षित)
पगार - दोनही पदासाठी पगार हा 25,000 रुपये पर्यंत प्रति महिना मिळेल.
असा करा अर्ज - इच्छुक उमेदवारांनी ICAR- Central Citrus, Research Institute समोर नियोजित तारखेला आणि वेळेवर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता - ICAR- Central Citrus, Research Institute, NBSS & LUP & Regional रिमोट सेन्सिंग सेंटर, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर याठिकाणी साध्या कागदावर संपूर्ण अर्जासह एक अद्ययावत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.👇
https://ccri.icar.gov.in/ccringp/