Job Vacancies | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Jobs Vacancy in Vasantrao Naik Marathwada Agricultural University,Parbhani 👇
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यामार्फत कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात.
कृषी महाविद्यालय, आंबेजोगाई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) शिक्षक सहयोगी (व्याख्याता) पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
एकूण पदांची संख्या - 02
पदाचे नाव -
1) सहयोगी व्याख्याता - कृषी अर्थशास्त्र - 01
2) सहयोगी व्याख्याता - पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र - 01
निवड प्रक्रिया - प्रत्यक्ष मुलाखत पद्धतीने
मुलाखतीचे ठिकाण - कृषी महाविद्यालय, आंबेजोगाई
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन पद्धत
या कंत्राटी भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा प्रकारे अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) 👇
सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय,आंबेजोगाई
व.ना.म.कृ. विद्यापीठ, परभणी.
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.vnmkv.ac.in/