Combined Notification ASRB - राष्ट्रीय पात्रता चाचणी (ASRB NET)- 2023, विषय विशेषज्ञ (ASRB SMS) (T-6) आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (ASRB STO) (T-6) परीक्षा - 2023
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB) ने राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) 2023, विषय विशेषज्ञ (SMS) (T-6) आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) (T-6) परीक्षा - 2023 भरती परीक्षेसाठी संयुक्त अधिसूचना जारी केली आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिसूचना नुसार या तीनही परीक्षांसाठी एकत्रित परीक्षा 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत घेण्यात येईल.
22 मार्च 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु👇
जे उमेदवार ASRB - NET,SMS किंवा STO या परीक्षांची तयारी करीत आहेत आणि अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची प्रक्रिया ही दिनांक 22 मार्च 2023 रोजी सुरू होणार आहे तर 10 एप्रिल 2023 रोजी या संयुक्त परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. ऑनलाईन अर्जाच्या वेळी Unreserved (UR) कॅटेगरीच्या उमेदवारांना एसएमएस व एसटीओ परीक्षेसाठी 500 रुपये आणि नेट परीक्षेसाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील तसेच महिला, SC,ST आणि PwBD च्या उमेदवारांना फक्त नेट परीक्षेसाठी 250 रुपये भरावे लागतील, जे की तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुम्ही भरू शकता.
1) ASRB NET 2023 -
देशभरातील राज्य कृषि विद्यापीठे व अन्य कृषी विद्यापीठांमधील व्याख्याता / सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी एएसआरबीकडून राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2023 घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी उमेदवारांना संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच 1 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे.तुम्ही ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकता या वर कोणतीही मर्यादा नाहीत.
परीक्षेचे स्वरूप - 👇
या ऑनलाइन परीक्षेत एकूण 150 प्रश्न विचारले जातात(Objective Type).प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिला जातो म्हणजेच एकूण 150 गुणांचा पेपर असतो.या परीक्षेमध्ये Negative Marking System (नकारात्मक पद्धत) असून ज्यामध्ये 1/3 ही पद्धत वापरली जाते.
परीक्षेचा कालावधी हा एकूण 2 तासांचा असतो.
ही परीक्षा एकूण विविध प्रकारच्या 60 कृषी व कृषी सलंग्न विषयामध्ये घेतली जाते. या सर्व विषयांची यादी अधिकृत वेबसाईट वर आहे.
पास होण्यासाठी आवश्यक गुण -
यामधे उमेदवारांच्या कॅटेगरी नुसार पास होण्यासाठी खालील गुणांची आवश्यकता आहे.
1) UR Category - 50% - 75 गुण
2) EWS & OBC - 45% - 67.5 गुण
3) SC,ST,PwBD - 40% - 60 गुण
परीक्षेचे ठिकाण -
महाराष्ट्रातील एकूण प्रमुख 3 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने मुंबई , नागपूर आणि पुणे (यावर्षी पासून) यांचा समावेश होतो. तर भारतातील एकूण 44 शहरात ही परीक्षा घेतली जाते.
2) ASRB - STO 2023
याच प्रकारे वरिष्ठ तंत्र अधिकारी भरती 2023 अंतर्गत एकूण 32 पदांसाठी निवड प्रक्रिया एएसआरबीद्वारे राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील संयुक्त परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखतीत उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाईल.
परीक्षेचे ठिकाण -
महाराष्ट्रातील एकूण प्रमुख 3 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने मुंबई , नागपूर आणि पुणे (यावर्षी पासून) यांचा समावेश होतो. तर भारतातील एकूण 44 शहरात ही परीक्षा घेतली जाते.
परीक्षेचे स्वरूप - 👇
या ऑनलाइन परीक्षेत एकूण 150 प्रश्न विचारले जातात(Objective Type). त्यानंतर मुलाखत साठी 30 गुण असतात. परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा असतो.या परीक्षेमध्ये Negative Marking System (नकारात्मक पद्धत) असून ज्यामध्ये 1/3 ही पद्धत वापरली जाते.
पास होण्यासाठी आवश्यक गुण -
यामधे उमेदवारांच्या कॅटेगरी नुसार पास होण्यासाठी खालील गुणांची आवश्यकता आहे.
1) UR Category - 50% - 75 गुण
2) EWS & OBC - 45% - 67.5 गुण
3) SC,ST,PwBD - 40% - 60 गुण
3) ASRB - SMS 2023
याच प्रकारे विषय विशेषज्ञ अधिकारी भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी निवड प्रक्रिया एएसआरबीद्वारे राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील संयुक्त परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखतीत उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाईल. यामधे उमेदवारांना दिलेल्या पैकी कोणतेही कृषी विज्ञान केंद्र (KVK) निवडावे लागेल याला कोणतेही बंधन नाही पण एकदा का फॉर्म सबमिट केला की निवडलेल्या KVK मधे उमेदवारांना कोणतेही बदल करता येणार नाही.
परीक्षेचे स्वरूप - 👇
या ऑनलाइन परीक्षेत एकूण 150 प्रश्न विचारले जातात(Objective Type). त्यानंतर मुलाखत साठी 30 गुण असतात. परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा असतो.या परीक्षेमध्ये Negative Marking System (नकारात्मक पद्धत) असून ज्यामध्ये 1/3 ही पद्धत वापरली जाते.
परीक्षेचे ठिकाण -
महाराष्ट्रातील एकूण प्रमुख 3 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रामुख्याने मुंबई , नागपूर आणि पुणे (यावर्षी पासून) यांचा समावेश होतो. तर भारतातील एकूण 44 शहरात ही परीक्षा घेतली जाते.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी
http://www.asrb.org.in
तर मित्रांनो हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबसक्राईब करा.