Job Recruitment || भारतीय कृषी विमा कंपनी || Agriculture Insurance Company of India Limited (AIC) Recruitment
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मध्ये बंपर भरती;
Agriculture Insurance Company of India Limited (AIC) Recruitment
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचे ठिकाण याबाबतची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ..
निवडलेल्या उमेदवाराला 60,000 रुपये मासिक पगार मिळणार आहे.
पदांची संख्या – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या 40 जागासाठी ( 40 Posts) भरती करण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण - भारतात कोठेही (Anywhere in India)
नियुक्ती कार्यकाळ – सुरवातीला नियुक्ती ही 01 वर्षांच्या कालावधीसाठी असेल नंतर वाढवण्यात सुध्दा येऊ शकते.
वयोमर्यादा - अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा. (Not more than 45 Years)
शैक्षणिक पात्रता – (Educational Qualification)
1) Rural Management
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण व्यवस्थापन विषयातून किमान ६०% गुणांसह पदवी (पदव्युत्तर) उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान व कौशल्य.
(Post Graduation or Graduation in Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management with a minimum of 60% marks )
2) Legal
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा विषयातून पदवीधर असावा.
(Graduation in Law with min. 60% (SC/ST- 55%) marks in aggregate)
पगार - दोनही पदासाठी पगार हा 60,000 रुपये पर्यंत प्रति महिना मिळेल.
निवड प्रक्रिया पद्धत - (Selection Process)
1) ऑनलाईन परीक्षा - ऑनलाईन परीक्षा ही एकूण 150 गुणांसाठी घेतली जाईल आणि त्यासाठी 2 तास 15 मिनिटे वेळ दिला जाईल (135 Minutes). या परीक्षेत negative marking पद्धत आहे.
2) मुलाखत - एकूण 50 गुणांसाठी असेल.
३) शारीरिक तपासणी व कागदपत्रांची छाननी
* Online Application Form फी -
१) SC/ST/PwBD - फक्त 200 रुपये
२) Other Category - 1000 रुपये
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख - (Last Date)
फॉर्म भरण्याचा कलावधी हा 22 मार्च ते 06 एप्रिल 2023 सायंकाळी 8.00 पर्यंत आहे.
असा करा अर्ज - इच्छुक उमेदवारांनी www.aicofindia.com या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
👇