वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यंग प्रोफेशनल जाहिरात - नागपूर
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात काम करण्याची सुवर्णसंधी;
४० हजार पर्यंत पगार मिळणार, लवकर अर्ज करा..
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पाठवण्याचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घ्या..
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या २०२३ च्या भरतीच्या अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवाराला ४० हजार रुपये मासिक पगार मिळणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये पोस्टिंगचे ठिकाण हे 'नागपूर' असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पदांची संख्या – यंग प्रोफेशनल पदाच्या ०१ जागांवर ०१ वर्षाच्या करारानुसार भरती करण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण - नागपूर
नियुक्ती कार्यकाळ – सुरवातीला नियुक्ती ही ०१ वर्षांच्या कालावधीसाठी असेल नंतर वाढवण्यात सुध्दा येऊ शकतो.
वयोमर्यादा - अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन (एमबीए इन मार्केटिंग - शक्यतो कृषी/ग्रामीण विपणन) / MBA ( Agri/ABM/Marketing/Rural Marketing).
पगार - ४०,००० रुपये पर्यंत प्रति महिना
असा करा अर्ज -
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी nagpur-dgft@nic.in वर ईमेलद्वारे अर्ज पाठवावेत किंवा सहाय्यक दस्तऐवजांसह त्यांचा वैध ईमेल आयडी वापरून ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही १५ मार्च २०२३ असून अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.